Moksh Seva

गुरुजी ऑन डिमांड दिनांक १ जून २०२० पासून पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात "मोक्ष सेवा" हा प्रकल्प सुरू करीत आहोत. या सेवेच्या अंतर्गत मृत्यू नंतर मंत्राग्नि पासून १४ व्या दिवशी च्या उदकशांती पर्यंत लागणारे गुरुजी व पूजेचे साहित्य देण्याचे कार्य होते. पुण्या सारख्या मोठ्या शहरामध्ये आजमितीला अंत्यविधी करण्यासाठी अनेक प्रकारच्या साहित्याची तसेच गुरुजींसाठी शोधाशोध करावी लागते. कोणाचाही मृत्यू हा त्याच्या कुटुंबियांसाठी अतिशय दुःखद प्रसंग असतो. अशा प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना या सर्व गोष्टी जमविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागते,घरच्यांना दुःखाच्या क्षणी वेळ देणे गरजेचे असते पण कर्तव्याप्रति माणूस बांधलेला असतो म्हणून त्याला स्वकीयांना वेळ देता येत नाही. अशा प्रसंगी गुरुजी ऑन डिमांड त्यांची समस्या सोडवून सर्व गोष्टी एकाच क्लीक वर अथवा एकाच फोन कॉल वर सर्व गोष्टी उपलब्ध करून देत आहे. या योजने अंतर्गत मंत्राग्नि, दशक्रिया, अकरावा, बारावा, तेरावा पंचक शांती, तत्रिपाद शांती तसेच उदकाशांत ह्या प्रकारचे विधी साहित्य सहीत केले जातात. हे सर्व विधी गुरुजी ऑन डिमांड च्या मोबाईल अँप् वरून किंवा वेब साईट वरून याजमान बुक करू शकतात व प्रसंगी मोबाईल फोन वरून सुद्धा बुकिंग करता येऊ शकते. तसेच वरील पूजा ह्या एकत्रित किंवा वेगवेगळ्या सुद्धा बुक करता येऊ शकतात. या साठी गुरुजी ऑन डिमांड २४ तास सेवा देते. २४ तास मदतीसाठी ९५५२००७८७७ ह्या मोबाईल नंबर वर संपर्क करता येतो. अधिक माहिती साठी संपर्क - ९५५२००७८७७ वेब साईट :- "www.gurujiondemand.com"