योगिनी एकादशीला विष्णु-शिव पूजेचा सुंदर योगायोग…
हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. दोघांना एकत्रित हरिहर म्हणतात. योगिनी एकादशीला विष्णूची पूजा केली जाते आणि त्या दिवशी सकाळपासून दिवसभर शिववास आहे. अशा स्थितीत ज्यांना योगिनी एकादशीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे, ते सकाळपासून करू शकतात.
हिंदू कॅलेंडरनुसार, ह्या वर्षी ज्येष्ठ कृष्ण एकादशी १३ जून रोजी सकाळी ०९:२८ ते दुसऱ्या दिवशी १४ जून रोजी सकाळी ०८:४८ पर्यंत आहे. योगिनी एकादशी तिथी दोन्ही दिवशी पहाटे आहे, पण उदयतिथी महत्त्वाची असते. त्यानुसार बुधवार, १४ जून रोजी आषाढ कृष्ण एकादशीची उदयतिथी प्राप्त होत आहे. एकादशी त्या दिवशी सकाळी ०८:४८ पर्यंत आहे, परंतु योगिनी एकादशीचे व्रत १४ जूनलाच ठेवणे योग्य ठरेल. १३ जून रोजी सूर्योदयानंतर योगिनी एकादशीची तिथी सुरू होते.
१. योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते.
२. या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो.
३. योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते.
४. असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते.
५. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते.
६. असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे, एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते.
७. ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप, गुण आणि प्रसिद्धी मिळते.
व्रत विधी: या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी. त्यांना तुळस व कमळ वाहावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास सोडावा. शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा, त्याने एकादशीचे पुण्य दुप्पटीने मिळते.