अनेक कुटुंबांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत केले जाते. परंतु यावर्षी ५ गुरुवार आले असुन शेवटच्या गुरुवारी दिवसभर चतुर्दशी असून सायंकाळी ७ वा. १५ मि. नी अमावस्या प्रारंभ होत असल्याने शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करावे कि नाही ? हा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. त्याचे पंचांगशास्त्रानुसार उत्तर असे कि, अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस असतो. या शेवटच्या गुरुवारी दिवसभर चतुर्दशी व सायंकाळी अमावस्या प्रारंभ होत असली तरी या शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणेच महालक्ष्मी पूजन व व्रत करावे.
शेवटच्या गुरुवारी अमावस्या लागते म्हणुन त्या गुरुवारी व्रत करणे चुकवू नये. त्यादिवशी देखील व्रत, पूजन, उपवास आवश्य करावा.