वसंत पंचमी

भगवती सरस्वती ही विद्या, बुद्धि, ज्ञान आणि वाणीची प्रमुख देवता आहे. शास्त्र-ज्ञान देणारी आहे.
वाग्देवी ब्रह्मा स्वरूप, कामधेनु आणि सर्व देवतांची प्रतिनिधी आहे. तीच ज्ञान, बुद्धिमत्ता आणि सरस्वती आहे. अशाप्रकारे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथीला देवी सरस्वतीची पूजेचा दिवस निश्चित केला गेला आहे. वसंत पंचमी हा त्यांचा उदय होण्याचा दिवस मानला जातो. म्हणून या तारखेला वागीश्वरीजयंती आणि श्री श्रीपंचमी म्हणूनही ओळखले जाते.

पूजेचा क्रम :
भगवती सरस्वतीच्या पूजेच्या प्रक्रियेत सर्वप्रथम आचमन, प्राणायाम आदीद्वारे बाह्य पवित्र करा. मग सरस्वतीच्या पूजेची प्रतिज्ञा घ्या. यामध्ये देशकालादी रचताना शेवटी ‘यथोपलब्धपूजनसामग्रीभिः भगवत्याः सरस्वत्याः पूजनमहं करिष्ये’ वाचून संकल्प सोडा.
१. प्रथम गणपती पूजन करून धूप दीप नैवेद्य अर्पण करा.
२.कलश पूजा करून धूप दीप नैवेद्य अर्पण करा.
३. सरस्वतीची उपासना करताना पुढील श्लोकाने देवीचे आवाहन करा

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्मच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा।।

तसेच ‘श्री हरी सरस्वत्ये स्वाहा’ या मंत्राने प्रत्येक वस्तू अनुक्रमे समर्पित करा. देवीला धूप दीप नैवेद्य अर्पण करा. शेवटी सरस्वती देवीची आरती करुन तीचे गुणगान करा.
अशा प्रकारे ज्ञान आणि बुद्धीची प्रमुख देवी सरस्वतीचा महिमा अपार आहे. सरस्वती देवीची पुढील द्वादश नामवली सर्वश्रुत आहे. भगवती सरस्वतीचे दिवसाच्या तीनही वेळी पाठ केल्याने सरस्वती त्या व्यक्तीच्या जिभेवर विराजमान होते –

प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती।
तृतीयं शारदा देवी चतुर्थ हंसवाहिनी।।
पंचम जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा।
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी।।
नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी।
एकादशं चन्द्रकान्तिद्र्वादशं भुवनेश्वरी।।
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः।
जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मारूपा सरस्वती।।

|| शुभं भवतु ||