वास्तूशांतीचा मुहूर्त मिळत नाहीये? हे आहेत उपाय…

वास्तुशांती चा मुहूर्त नाही? नवीन घरी राहायला जाता येत नाही? ह्याला उपाय आहे!

काही वेळा नवीन घर बांधून होते किंवा नवीन घर घेतलेलं असतं पण वास्तुशांतीचे मुहूर्त नसतात. कधी तरी घरमालकांचा तगादा असतो किंवा नवीन घरात रहायची ओढ, अशी बरीच कारणे असतात. मग अश्या वेळेस मुहूर्त नसल्यास काय करावे? अहो घाबरू नका, ह्याला उपाय आहे.

वास्तुशांती केल्याखेरीज नव्या घरात राहण्यास जाऊ नये असे नाही. अश्या वेळेस उदकशांती अथवा ग्रहयज्ञ करून गृहप्रवेश करावे. तत्पूर्वी ज्योतिषाकडून योग्य दिवस विचारून घेऊन त्यादिवशी हळदकुंकू, पाण्याने भरलेला तांब्या,थोडे तांदूळ, हार, पेढे व देवाचा फोटो प्रथम उभयतांनीं नव्या घरात नेऊन ठेवावे. देवाचे फोटो हार घालून,पेढयाचा नैवेद्य समर्पण करून नमस्कार करावा. नंतर पती आणि पत्नीने पेढा खाऊन पाणी प्यावे. ह्या धार्मिक कृत्यानंतर नंतर घरी राहावयास जावे व नंतर मुहूर्त मिळाला कि वास्तुशांती करावी. घरातील सर्व मंडळींसह मंगलकलश, दीप व देव घेऊन ब्राम्हणांनी मंत्रपठण करत गृहप्रवेश करावा. हे करणे आवश्यक आहे.

बस झालं  तर मग, आता नवीन घराचा आनंद घेण्यास तुम्ही मोकळे!


गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand