ग्रहणकाळात फलप्राप्तीसाठी करा या मंत्रांचा जप…

मंत्रोपदेश घ्यावयाचा तो फक्त सूर्यग्रहणातच घ्यावा त्यानंतर प्रत्येक सूर्य-चंद्र ग्रहणात त्या मंत्राचे पुरश्चरण करावे म्हणजे मंत्राला मालिन्य व शिळेपणश येत नाही. गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र नवग्रहांचे मंत्र त्या त्या देवतेच्या सख्येइतक्या वेळा म्हणजे अथर्वशीर्ष २१ वेळा श्रीसूक्त १६ वेळा याप्रमाणे म्हणावे.

ग्रहणाचा पुण्यकाल कमी वेळ असेल तर ही संख्या कमी करावी कारण पुण्यकालातच हे सर्व करावयाचे आहे सौरसूक्त मात्र दोनही ग्रहणात म्हणू नये.

स्त्रियांनी पुण्यकालात स्तोत्र पाठ (महिम्न, व्यंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्त्रनाम, गणेश, देवी सहस्त्रनाम) व नामजप करावा उदा – श्रीराम जयराम जय जय राम.. रघुपति राघव राजा राम… नमो भगवते वासुदेवाय …नमो भगवते गजाननाय…

ग्रहण स्पर्श व मोक्षस्नाने पुरुषानी डोक्यावरून करावी सुवासिनी स्त्रियानी मात्र गळ्याखालील करावी.

दर्भ ठेवलेली वस्तू बिघडत नाही हे आता विज्ञानानी सिद्ध झाले आहे दर्भ ठेवलेली वस्तू अपवित्र होत नाही म्हणून लोणची इत्यादि पदार्थावर दर्भ ठेवण्याची प्राचीन पद्धति आहे दर्भ ठेवलेले वस्त्र ग्रहणानंतर घेण्यास हरकत नाहीज्या कपड्याना ग्रहण काळात आपण शिवलो नाही, त्या वस्तू विटाळत नाहीत .

संदर्भ- धर्मशास्त्रीय निर्णय, दाते पंचांग.

गुरुजी ऑन डिमांडवरुन गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि  परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच
मागवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-

https://gurujiondemand.com/catalogue

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand