शारदीय नवरात्र

आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे.
नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.

नवरात्रात कुंकुमार्चन, श्रीसूक्त अभिषेक, सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन.
दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते. *राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे.*
अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.

*स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत.*

*२ वर्षाची- कुमारी*
*३ वर्षाची -त्रिमूर्तीनी*
*४ वर्षाची -कल्याणी*
*५ वर्षाची – रोहिणी*
*६ वर्षाची -काली*
*७ वर्षाची -चंडिका*
*८ वर्षाची -शांभवी*
*९ वर्षाची – दुर्गा*
*१० वर्षाची-सुभद्रा*                                                                       

*कुमारिकापूजनाचे फळ पुढीलप्रमाणे:–*

*१ कुमारिका पूजन- ऐश्वर्यप्राप्ती*
*२ कुमारिका पूजन– भोग व मोक्ष प्राप्ती*
*३ कुमारिका पूजन  — धर्म व अर्थ प्राप्ती*
*४ कुमारिका पूजन– राज्यपदप्राप्ती*
*५ कुमारिका पूजन– विद्या प्राप्ती*
*६ कुमारिका पूजन– षट् कर्म सिद्धी*
*७ कुमारिका पूजन—राज्य प्राप्ती*
*८ कुमारिका पूजन–संपत्ती*
*९ कुमारिका पूजन–पृथ्वीचे राज्य मिळते.*

*नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे:-*
रविवारी -पायस(खीर)
सोमवारी -गायीचे तूप
मंगळवारी -केळी
बुधवारी – लोणी
गुरुवारी -खडीसाखर
शुक्रवारी – साखर
शनिवारी -गायीचे तूप.