शनी ग्रह रास बदलतोय ! जाणून घ्या काय होईल तुमच्या राशीवर परिणाम….

येत्या २४ तारखेपासून शनी महाराज धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहेत.
पुण्यकाळ : शुक्रवारी सकाळी ६:५९ ते दुपारी १२:४७ पर्यंत आहे.
पुण्यकाळात जप , दान , पूजा करणे पुण्यकारक व पीडापरिहारक आहे.

मकर राशीचा शनी – मकरेस पहिला, धनुस दुसरा, वृश्चिकेस तिसरा, तुळेस चौथा, कन्येस पाचवा, सिंहेस सहावा, कर्क राशीस सातवा, मिथुनेस आठवा, वृषभेस नववा, मेषेस दहावा, मिनेस अकरावा आणि कुंभेस बारावा या प्रमाणे आहे.

राशी परत्वे फळ :
राशी पाद फळ
सिंह – मकर – मीन – सुवर्ण चिंता
वृषभ – कन्या – धनु – रौप्य शुभ
मेष – कर्क – वृश्चिक – ताम्र श्रीप्राप्ती
मिथुन – तुला – कुंभ – लोह कष्ट

साडेसाती असलेल्या लोकांनी व्यवहारिक जगात वावरताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे,अनावश्यक वाद,अहंकार, मीपणा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
या काळात अनेक उत्तम गोष्टी ही आयुष्यात घडतात.

उपाय :
१.पीडा परीहारास शनी जप आणि दान करावे तसेच येणाऱ्या २४ जानेवारी ला शनी अथवा मारुती ला अभिषेक करून घ्यावा.
२.धनु – मकर – कुंभ राशीस साडेसाती असून या राशीच्या लोकांनी पिडपरिहारार्थ शनीचा तैल अभिषेक , जप व दान करावे.
३. रोज मारुती स्तोत्र पठण करावे,तसेच मारुतीचे दर्शन घ्यावे किंवा शनी महात्म्या वाचावे.