पौर्णिमा 12 तारखेला , मात्र दत्तजयंतीची पुजा करा 11 तारखेलाच…..

मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस म्हणजे दत्तजयंती हा प्रत्येक दत्तभक्तासाठी अपुर्व सोहळा असतो. मात्र यावर्षी कॅलेंडरमध्ये दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी पौर्णिमा दिली असुनही आदल्या दिवशी म्हणजे दि. ११ रोजी ‘दत्तजयंती’ साजरी करावी अस सांगितलय. तर हे कस ?? असा प्रश्न सामान्य जनांस पडतो.


याच कारण “धर्मसिंधु” ग्रंथात असे आहे कि ज्या दिवशी “प्रदोषव्यापिनी” म्हणजे सायंकाळचे वेळी सर्वात जास्त काळ पौर्णिमा आहे असा दिवस दत्तजयंती म्हणुन साजरा करावा. याशिवाय “निर्णयसिंधु” ग्रंथ असे सांगतो कि अठरा घटिका पेक्षा कमी म्हणजे सर्वसाधारण ७ तास १२ मिनिटापेक्षा कमी वेळ चतुर्दशी असुन नंतर पौर्णिमा असेल तो दिवस पौर्णिमेच्या कोणत्याहि व्रतास योग्य व इष्ट समजावा. म्हणजेच दि. ११ रोजी सकाळी १०:५९ वा. चतुर्दशी संपुन पौर्णिमा सुरु होते व ती दि. १२ डिसेंबर रोजी स. १०:४२ पर्यंत आहे. म्हणुन दि. ११ चा दिवस सर्वप्रकारच्या दत्तजन्मासाठी म्हणजे दुपारी १२ वा. आणि सायंकाळी ६ वाजता साजर्‍या होणार्‍या दत्तजयंतीसाठी इष्ट समजावा.
याचाच अर्थ यावर्षी दि. ११ डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी. अभिषेक, याग, अन्नदान (फराळ) यासाठी दि. ११ चाच दिवस इष्ट समजावा.


दत्तजंयतीसाठी गुरुजींची वेळ नोंदवण्यासाठी आणि दत्तयागासाठी परिपुर्ण पुजा साहित्य घरपोच मागवण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
https://gurujiondemand.com/catalogue/datta-jayanti-pujan_109/


संदर्भ- धर्मसिंधु, निर्णयसिंधु, दाते पंचांग.

Download our app –
https://play.google.com/store/apps/details?id=com.snt.gurujiondemand