ग्रहांची शांत करणे आवश्यक आहे का?

पृथ्वी पासून ग्रह कितीतरी दूर आहेत. अशा ग्रहाचा पृथ्वीवर किंवा मानवावर परिणाम होत नाही, अशी अनेकांची समजूत आहे. पण ती बरोबर नाही. कारण जी घटक द्रव्ये माणसात आहेत तीच घटक द्रव्ये ग्रहात आहेत. हि घटक द्रव्ये माणसात अल्पप्रमाणात आहेत तर ग्रहांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या घटक द्रव्यांच्या ग्रहांचा परिणाम अल्पप्रमाणात असलेल्या घटकद्रव्याच्या माणसावर होणे स्वाभाविक आहे. हे सर्व योगमार्गाने जाणून ऋषीमुनींनी याचे शास्त्र तयार केले. ते ज्योतिष शास्त्र. याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. १) ग्रहांचे पृथ्वीवर होणारे परिणाम,  २) ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम.

परिणाम अनुकूल वा प्रतिकूल असतात. असे परिणाम सर्व ग्रहांचे असतात. त्यात गुरु व शनी ग्रहांचे परिणाम जास्त दिसतात. जसे शनी ची साडेसाती. साडेसातीच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनेकांना याचा अनुभव येतो. अशावेळी शनी ग्रहाची शांति, जप, दान, होम, इ. प्रकरणी केली असता त्रास कमी होतो हे शास्त्र सांगते व तास अनुभव हि आहे. यालाच उपासना किंवा शांति असे म्हणतात. प्रतिकूल काळ असल्यास प्रतिकूलता कमी होते तर अनुकूल काळ असल्यास अनुकूलता वाढते. उपासनेचा उपयोग दोन्ही वेळेस होतो. लग्न वा मुंजी च्या वेळी सर्व ग्रहांची अनुकूलता असावी म्हणून तत्पूर्वी ग्रहयज्ञ करण्याची परंपरा आहे. ग्रहांची प्रतिकूलता व त्यामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होणे याकरिता सहनती करणे आवश्यक आहे.